शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

पुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून वादाला सुरुवात, राजकीय पक्ष उतरले मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:35 PM

महापालिकेच्या माध्यमातून  उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.  

ठळक मुद्देपुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून नाराजी, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपवर टीका आठ महिन्यांपूर्वी अर्ज केल्याने निधी मिळाल्याचे कात्रज शिवसृष्टी प्रशासनाचे स्पष्टीकरण 

 

पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून  उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या याविषयावर विविध संघटना, इतिहास अभ्यासक आणि राजकीय पक्षांनी मते नोंदवली आहेत. 

 

याबाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,बाबासाहेब पुरंदरे यांच्यामार्फत उभारण्यात येणारी शिवसृष्टी  खासगी संस्था आहे. त्यांना निधी मागण्याचा अधिकार आहे.त्यांना किती निधी द्यायचा ते राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील. आम्ही  महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या  शिवसृष्टीचा पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापालिकेचे विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. भाजपने पुणेकरांच्या भावनेशी खेळ थांबवावा. १५ दिवसात निर्णय घेऊ सांगणारे मुख्यमंत्री एक शब्दही उच्चारायला तयार नाहीत अशा शब्दात त्यांनी आपला रोष वाक्य केला. कात्रजला उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या आतमध्ये नेमके काय दाखवणार आहेत हे देखील सांगितलेले नाही.कुठलाही आराखडा समोर नसताना तिथे काय करणार आहेत तरी कळायला हवे असेही ते म्हणाले.  

 

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तर तिसरीच भूमिका मांडली असून पुणेकरांना कात्रज आणि चांदणी चौक या दोन्ही भागातील शिवसृष्टी लांब पडत असून शनिवरवाड्यावर तिसरी शिवसृष्टी उभारावी अशी अजब मागणी केली. कात्रज येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी आम्ही आठ महिन्यांपूर्वी जेएनपीटीच्या अंतर्गत असणाऱ्या सीएसआरच्या माध्यमातून निधीची मागणी केल्याचे सांगितले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळून निधी जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसृष्टीचे काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले असून पुढील दोन वर्षात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस