शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधी करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , दोन जणांचा मृत्यू; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:10 IST

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कारने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना धुमाळ कुटुंबियांची गाडी पालखी तळाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकली.

नीरा ( पुरंदर )  : डिस्कळ येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीवरुन माघारी येताना कारने ओढ्याच्या कठड्याला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जण मृत्यूमुखी पडले. हा अपघात फलटण-लोणंद रस्त्यावर पालखी तळाजवळील भोवर ओढ्याच्या पुलावर पहाटे दोनच्या सुमारास झाला. मृत व्यक्ती नीरा व जेऊर येथील आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

    गाडीचे चालक संजय शिवाजी धुमाळ (वय ४३, रा. मांडकी ता. पुरंदर) व शोभा नंदकुमार धुमाळ (४५, सध्या नीरा मूळ रा. पाडेगाव ता. फलटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, धुमाळ कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कार (एमएच-१२. एचझेड. ७७२७) ने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना त्यांची गाडी पालखी तळाजवळील कठड्याला धडकली. यामध्ये चालक संजय धुमाळ व शोभा धुमाळ हे ठार झाले. तर सारिका संजय धुमाळ,कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय धुमाळ हे पुरंदर नागरी पतसंस्थेच्या नीरा शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. 

टॅग्स :PurandarपुरंदरAccidentअपघातDeathमृत्यू