शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 13:53 IST

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे सुरू आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची निदर्शने : कुरकुंभच्या व्यापार पेठेत दगडफेक

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंत्राट पद्धतीने देण्यात आलेल्या स्ट्रीटलाईट सुधार कामाच्या वेळेस सचिन परब (वय ३०, रा. दौंड) हा विजेच्या खांबावरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्यानंतर काही वेळातच दौंड येथील जवळपास ५० तरुणांच्या समूहाने  व्यापार पेठेत दगडफेक करून कुरकुंभ बंद केले. या दगडफेकीत कुरकुंभचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मृत सचिन परब हा अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे करीत होता. सध्या कुरकुंभ येथे पारंपरिक यात्रा-उत्सव सुरू होणार असल्यामुळे परिसरात लाईटची कामे सुरू असताना हा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून, हा अपघात नक्की कशामुळे झाला, हे पाहणे आवश्यक आहे. दरम्यान, कुरकुंभच्या यात्रा-उत्सवावर दगडफेकीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांनी एकत्र येऊन कुरकुंभ चौकात निदर्शने केली व रास्ता रोको केला. त्यामुळे बºयाच कालावधीपर्यंत वातावरण तणावपूर्ण झाले होते. या वेळी दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ग्रामस्थांना शांत करीत दोषींवर कारवाई करण्याची हमी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी कुरकुंभ येथे झालेल्या प्रकाराने शनिवार, रविवारी असणाऱ्या यात्रेच्या उत्सवावर भीतीचे सावट पसरले असून पारंपरिक यात्रा-उत्सवात गालबोट लागू नये म्हणून सरपंच राहुल भोसले यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. माणुसकीचे दर्शन बारामतीहून दौंडकडे जात असलेले फिरोज सुलतान तांबोळी यांनी परब याला खांबावरून पडताना पाहिले व तातडीने जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला त्वरित रुग्णवाहिकेतून दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.............

टॅग्स :Kurkumbhकुरकुंभmahavitaranमहावितरणgram panchayatग्राम पंचायतDeathमृत्यू