शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एक तासापूर्वीच माहेरी आली अन् काळाचा घाला! नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:14 IST

गुरांना घास आणण्यासाठी भावा सोबत शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला

यवत : कासुर्डी (ता. दौंड) येथे माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ११) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली.

पोलिस पाटील अश्विनी सोनवणे यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार सुहानी तुषार तम्मनर (वय २२, रा. विश्रांतवाडी, पुणे) ही विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डी येथे आली होती. वडील सुदाम दगडू ठोंबरे यांच्या शेतात कामे सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते. सुहानी हीसुद्धा तिच्या कुटुंबासमवेत शेतात गेली होती. वातावरण ढगाळ होते मात्र सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उरुळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचे निधन झाले.

एक तासापूर्वीच आली होती माहेरी

मागील वर्षीच सुहानी हिचा विवाह झालेला होता. तिचे सासर विश्रांतवाडी पुणे येथील होते. तिच्या मावशीच्या मुलीचे लग्न असल्याने माहेरी आली होती. गुरांना घास आणण्यासाठी भावा सोबत शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाDeathमृत्यूthunderstormवादळRainपाऊसhospitalहॉस्पिटल