कोल्हापूरच्या पर्यटकाचा नाणे मावळात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:10 IST2018-04-09T04:10:44+5:302018-04-09T04:10:44+5:30

नाणे मावळातील ढाकचा बहिरी सुळका आणि भीमाशंकरच्या ट्रेकसाठी आलेल्या कोल्हापुरातील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Death of Kolhapur Tournament in Maval | कोल्हापूरच्या पर्यटकाचा नाणे मावळात मृत्यू

कोल्हापूरच्या पर्यटकाचा नाणे मावळात मृत्यू

कामशेत (जि. पुणे) : नाणे मावळातील ढाकचा बहिरी सुळका आणि भीमाशंकरच्या ट्रेकसाठी आलेल्या कोल्हापुरातील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ढाक बहिरीच्या जंगलात घडली. शैलेश सूर्यमोहन भोसले (४८, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे.
कोल्हापुरातील २२ जण ट्रेकसाठी शुक्रवारी नाणे मावळातील जांभवली गावात मुक्कामाला आले होते. त्यातील शैलेश यांना शनिवारी दुपारी अचानक छातीत दुखायला लागले. त्यामुळे चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले.

Web Title: Death of Kolhapur Tournament in Maval

टॅग्स :Deathमृत्यू