शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डिंबा कालव्यात बुडणार्‍या नातीला वाचविताना आजोबांचा दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 19:29 IST

हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते.

मंचर : चास (ता.आंबेगाव) येथील शेगर मळा परिसरातून जाणाऱ्या डिंबा डावा कालव्याच्या पाण्यात बुडणार्‍या अन्विता प्रल्हाद शेगर (वय ९) हिला वाचविण्याचा प्रयत्न करणारे तिचे आजोबा सदाशिव विष्णू शेगर (वय ७०) या दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चास परिसरात सर्वत्र दुःखाची छाया पसरली आहे.

चास येथील शेगरमळा परिसरातून डिंभे धरणाचा डावा कालवा जात आहे. सदाशिव विष्णू शेगर , नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेखर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शेती जवळच असणाऱ्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर नजर चुकून अन्विता कालव्याकडे गेली. तिचा पाय घसरून कालव्यात पडल्याचे आजोबांनी पाहिले व त्यांनी तात्काळ कालव्यात उडी मारून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पाण्यात बुडाले, त्यांच्याबरोबर असणारी दुसरी नात स्वरा हिने मोठ्याने ओरडून आरडाओरड केला. आजूबाजूला असणाऱ्या शेतात काम करणाऱ्या महिलांनी देखील आरडाओरडा करून मदतीसाठी आवाज दिला. सिद्धेश संतोष शेखर यांनी तात्काळ परिसरातील तरुणांना या घटनेची माहिती दिली. दत्ता शेगर,रविभाऊ शेगर, संतोष शेगर, मनोज बारवे व राहुल काळे या तरुणांनी आजोबा व नात यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. 

टॅग्स :ambegaonआंबेगावDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणेWaterपाणी