शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपचारादरम्यान कोरोनाबाधिताचा मृत्यू; वाघोलीत संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 19:58 IST

ऑक्सिजन कमी पडल्याने वाघोलीतील मोरया हॉस्पिटलच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे पोलीस बंदोबस्तात स्थलांतर

वाघोली : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने वाघोली येथील मोरया हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांना सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. रुग्णाच्या स्थलांतराला विरोध करून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी काच फोडून स्टाफला धक्काबुक्की केली. दरम्यान एका गंभीर रुग्णाचा स्थलांतर दरम्यान मृत्यू झाला. याबाबत सायंकाळ पर्यंत पोलिसात तक्रार दाखल नव्हती.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली-उबाळेनगर येथे असणाऱ्या मोरया हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा रविवारी रात्री कमी पडू लागला होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कल्पना देऊन अतिदक्षता विभागातील रुग्णांचे इतर हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनानेच रुग्णांच्या स्थलांतराची सोय करण्यास मदत केली. दरम्यान स्थलांतरासाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध दर्शविला व हॉस्पिटलची काच फोडून स्टाफला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात व्हेनटीलेटर वरील एक व अतिदक्षता विभागातील ७ रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले. स्थलांतर करत असताना अतिधसका घेतल्याने हरिदास साहरुख (रा. मांजरी, वय ३२) या गंभीर रुग्णाचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. स्थलांतर दरम्यान हॉस्पिटलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोरया हॉस्पिटलमध्ये सध्या ३० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. मृत साहरुख या रुग्णाची परिस्थिती पूर्वीच गंभीर असल्यामुळे उच्च उपचारासाठी स्थलांतरीत करण्यास हॉस्पिटलने सुचविले होते मात्र नातेवाईकांनी नकार दिला होता असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला असून लाईनचे काम पूर्ण झाले असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. साहरुख यांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल