शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"मरण तर प्रत्येकालाच येतं, पण खऱ्या अर्थानं...;" वडिलांच्या निधनानंतर राजीव बजाज यांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:00 IST

उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी निधन झालं.

‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झालं. गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला. यानंतर राहुल बजाज यांचे सुपुत्र आणि बजाज ऑटोचे (Bajaj Auto) व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. 

त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) अबाऊटमध्ये एक भावूक संदेश लिहिला आहे. "मरण तर प्रत्येकालाच येतं, पण खऱ्या अर्थानं 'जगणारी' फार थोडी माणसं असतात," असं त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपच्या अबाऊट स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

सर्वसामान्यांची गरज ओळखलीसर्वसामान्यांच्या वाहनविषयक गरज ओळखून स्कूटरपासून ते भन्नाट स्पोर्टस् बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली. वर्षभराचे वेटींग असायचे तरीही लोकं पैसे भरुन ‘बजाज बुक’ केली असे अभिमानाने सांगायचे. बजाज ही केवळ कंपनी नव्हती तर सर्वसामान्यांसाठी ‘हमारा बजाज’ बनल्याचे  ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादुगार होते. त्यांच्या कारकिर्दीतील ‘एम फिप्टी’ आणि ‘एम एटी’ या दोन बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता. 

‘हमारा बजाज’ची कथात्या काळात बजाज स्कूटरची कायनेटिक होंडा व एलएमएल व्हेस्पा या गाड्यांसोबत स्पर्धा सुरू होती. बजाजच्या स्कूटर जुनाट वाटत असल्याने नव्याने ब्रॅंडिंगची कल्पना सुचली. बजाज स्कूटर देशातील सर्व घटक वापरत असल्याने सर्वांना आपलेसे वाटेल असे चित्रण जाहिरातीत केले. त्यातून ‘हमारा बजाज’ या ओळी शब्दबद्ध झाल्या. आणि नवा इतिहास घडला. हे शब्द प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेले.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप