शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:10 PM

कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

ठळक मुद्देआशिष हा गॅलरीत उभा होता, अचानक पडला़ खाली आत्महत्या आहे की, खाली पडल्याने मृत्यू झाला़ याबाबत कोंढवा पोलीस करीत आहेत़ तपास

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली़ उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला़ आशिष विलास कामटे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे.कोंढवा पोलिसांनी सांगितले, की आशिष हा बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे़ मकर संक्रातीनिमित्त त्याची विवाहित बहीण घरी आली होती़ तिला सासरी सोडवायचे होते़ आशिषने तिला सोडवावे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले़ रात्री साडेआठ वाजता आशिषचे वडिल हे जेवण करीत होते़ त्यावेळी आशिष हा गॅलरीत उभा होता़ अचानक तो खाली पडला़ त्याच्या डोक्याला मार लागला़ त्याला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते़ उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यु झाला़ आशिष हा गॅलरीतून सरळ खाली पडला़ त्याने उडी मारली असती तर तो थोड्या लांब अंतरावर पडला असता़ त्यामुळे ही आत्महत्या आहे की, खाली पडल्याने मृत्यू झाला़ याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़ 

टॅग्स :kondhvaकोंढवाPuneपुणे