शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे चाकणला चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:05 IST

चाकण येथील खंडोबा माळावरील पौर्णिमा कल्याण ढेले या चौदा वर्षांच्या मुलीचा रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

चाकण : चाकण येथील खंडोबा माळावरील पौर्णिमा कल्याण ढेले या चौदा वर्षांच्या मुलीचा रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍ॅक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये घडली. याबाबत वायसीएम पोलीस चौकीचे हवालदार लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत मुलीची आजी मंगल इंद्रजित उपाडे (वय ५०, रा.चाकण) यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेल्या माझ्या पौर्णिमा नातीला २७ नोव्हेंबर २०१८ रोजी रुबेला लसीकरण अंतर्गत तिला इंजेक्शन दिले होते. त्या इंजेक्शनमुळे तिला रिअ‍ॅक्शन झाल्याने तिला चालता येत नव्हते. म्हणून तिला प्रथम उपचारासाठी चाकण येथील डॉ. पाबळकर हॉस्पिटल येथे नेवून नंतर सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथे खासगी दवाखान्यात नेले. व पुढील उपचारासाठी १८ मार्च २०१९ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटल मधील आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट केले. उपचार चालू असताना दिनांक ३ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पौर्णिमा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार हे या घटनेचा तपास करत आहेत.  

टॅग्स :ChakanचाकणDeathमृत्यूPoliceपोलिस