नागराज मंजुळे यांना चित्रपटाचा सेट काढण्यासाठी आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:33 IST2018-02-15T05:33:09+5:302018-02-15T05:33:15+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेला सेट काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र, मंजुळे यांच्याकडून मैदानावरील सेट काढण्यासाठी कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.

The deadline for drawing a set of film to Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांना चित्रपटाचा सेट काढण्यासाठी आज अखेरची मुदत

नागराज मंजुळे यांना चित्रपटाचा सेट काढण्यासाठी आज अखेरची मुदत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेला सेट काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र, मंजुळे यांच्याकडून मैदानावरील सेट काढण्यासाठी कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.
मैदानाची मोठी जागा चित्रपटाच्या सेटसाठी व्यापण्यात आली आहे. उर्वरित काही भागात मैदानाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खूपच कमी जागा उरलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, राज्यपाल यांची परवानगी न घेताच मैदान भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाले.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की नागराज मंजुळे यांना विद्यापीठाकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांना सेट काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

Web Title: The deadline for drawing a set of film to Nagraj Manjule

टॅग्स :Puneपुणे