शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळवाडीतील दरीत आढळला तरुणाचा फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 12:11 IST

काळदरी गावच्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगराच्या उतारावरील रानामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आहे.

ठळक मुद्देसंबंधित युवकांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी आणि सहायक फौजदार एस. आर. गायकवाड करीत आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्यातील काळदरी गावच्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगराच्या उतारावरील रानामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आहे. दरम्यान संबंधित युवकांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अंकुश शिवाजी बांदल (वय २२, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. जीवन शिवाजी शेडगे (वय २०, रा. काळदरी, पिसाळवाडी) या गुरे राखणार्‍या तरुणाने संबंधित घटनेची पोलिसांना खबर दिली. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) काळदरी परिसरातील पिसाळवाडी येथील गुरे राखणारे गुराखी नेहमीप्रमणे डोंगराच्या परिसरात जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यातील एका शेतकर्‍याचा बैल चरताना दाट झाडीमध्ये गेला. व तो परत आणण्यासाठी गेला असताना त्या गुराख्याला लांबूनच उग्र असा वास आला. तसेच बैला जवळ गेला असता त्याला एका झाडाला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी इतर शेतकर्‍यांना बोलावून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सासवड पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मृतदेह झाडावरून खाली घेतला. तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याच ठिकाणी पंचनामा करून मृतदेहाची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशामध्ये आधारकार्ड मिळून आले. त्यावरून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी आणि सहायक फौजदार एस. आर. गायकवाड करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPuneपुणे