शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

सिंहगड रोडवरील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; हत्येचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 10:03 AM

पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

पुणे : सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील एका बंद फ्लॅटमध्ये तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तेजशा शामराव पायाळ (वय२९, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, माणिकबाग) असे या तरुणीचे नाव आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा मूळची बीड जिल्ह्यातील असून तिचे एमबीएचे शिक्षण झाले आहे. ती हिंजवडी येथील एका कंपनीत नोकरी करते. गेल्या दोन वर्षांपासून ती माणिकबाग परिसरात वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन तिच्या दोन बहिणी व आईसह राहत होती. मात्र सध्या दोन्ही बहिणी व आई या फ्लॅटमध्ये वास्तव्यास नव्हत्या. तेजसा २७ नोव्हेंबरला तिच्या मूळगावावरून माणिकबागेतील फ्लॅटमध्ये राहायला आली होती. तेजसाची आई शनिवारपासून तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र संपर्क होऊ न शकल्याने आई सोमवारी बीडवरून तेजसा राहत असलेल्या फ्लॅटवर आली असता फ्लॅटला कुलूप असल्याचे दिसले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, बेडवर संशयास्पद अवस्थेत तेजसाचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सिंहगड रोड पोलिसांकडून सांगण्यात आले. तेजसा हिच्या गळ्यावर व्रण दिसून आले असून घरात दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत. यावरुन तिचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :PuneपुणेBeedबीडDeathमृत्यू