चिंचवड : दत्तनगर येथील खाणीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने बुधवारी (दि. २) उडी मारली होती. गेल्या पाच दिवसांपासून अग्निशामक विभागातर्फे तरुणाचा शोध सुरू होता. अखेर सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तनगर येथील खाणीत सुनील रिवाज काळे (वय २५, रा. शंकरनगर ) या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत उडी मारली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी व प्राधिकरण अग्निशामक विभागाने तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, खाणीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने गेल्या पाच दिवसांपासून तरुणाचा शोध लागत नव्हता. अखेर सोमवारी सकाळी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.किरकोळ वादातून एकाचा खूनवाकड : मजुरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी एकाचा खून केल्याची घटना हिंजवडी येथे रविवारी (दि. ६) सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून, जयदेव हरिपथ देवनाथ (वय ३६, रा. सुसगाव, मूळ गाव, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गंगाराज दर्जी व रंजित दर्जी या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.सुसगाव येथील एका उद्योग केंद्रात हे तिघेही काम करत असून, तेथीलच एका खोलीत तिघेही राहत होते. रविवारी सायंकाळी यांच्यात गप्पा सुरू असताना अचानक वाद झाले. या वादातून आरोपी गंगाराज दर्जी व रंजित दर्जी यांनी जयदेव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जयदेव यांच्या छातीला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. (प्रतिनिधी)
बुडालेल्याचा सापडला मृतदेह
By admin | Updated: March 8, 2016 00:57 IST