शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

ससून शवागारातून पुन्हा एकदा मृतदेहाची अदलाबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 22:11 IST

आईऐवजी दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार : चौकशी समिती स्थापन

ठळक मुद्दे एका कुटुंबियाला दोनदा अंत्यसंस्कार तर दुसऱ्या कुटुबियांना केवळ अस्थी घेण्याची वेळ

पुणे : दोन महिलांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते़. शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी मृतदेह देताना एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबियांना दिला़. त्यानंतर दुसरे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी आले़. तेव्हा त्यांचा नातेवाईक महिलेचा तो मृतदेह नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ तोपर्यंत पहिल्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कारही होते़ ससून रुग्णालयात मृतदेह अदलाबदली होण्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे़. त्यामुळे एका कुटुंबियाला दोनदा अंत्यसंस्कार करावे लागले तर दुसऱ्या कुटुबियांना केवळ अस्थी घेण्याची वेळ आली़.याबाबत मंदाकिनी सुहास धिवर (वय ६२, रा़ आशानगर, गणेश खिंड) आणि विमल वसंत पारखे (वय ७०, रा़ धनकवडी) अशी निधन झालेल्या या दोन महिलांची नावे आहेत़. दोन्ही महिलांचा नैसर्गिकरित्या निधन झाले होते़. त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांनी ते ससून रुग्णालयातील शवागारात ठेवले होते़. दोन्ही मृतदेह मेडिको लीगल केस नव्हती़. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क भरुन ते शवागारात ठेवण्यात आले होते़. याबाबत मोबीन सय्यद यांनी सांगितले की, आमच्या नातेवाईक मंदाकिनी धिवर यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने आपण शुक्रवारी सायंकाळी शवागारात पार्थिव ठेवले होते़. शनिवारी सकाळी आम्ही धिवार यांचे पार्थिव घेण्यासाठी गेलो़. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याच महिलेचा मृतदेह आम्हाला दाखविला़. आम्ही त्यांना हा मृतदेह आमच्या नातेवाईक महिलेचा नसल्याचे सांगितले़. त्यांनी चौकशी केल्यावर विमल पारखे यांचा मुलगा उत्तम पारखे हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता शवागारात आले होते़. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह दाखविला़. त्यांनी तो आपल्या आईचा असल्याचे सांगितले़. पारखे यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि मग तो मृतदेह ताब्यात घेतला. कर्मचाऱ्यांनी पारखे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पुन्हा शवागारात बोलावून घेतले़. त्यांना दुसरा मृतदेह दाखविला. तेव्हा उत्तम पारखे यांनी हीच आपली आई असल्याचे सांगितले़. दोन्ही कुटुंबियांचे प्रत्येकी १५ ते २० नातेवाईक शवागारात जमले़. ससून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबियांची समजूत काढली़. दरम्यान, पारखे यांनी धिवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले होते़. दोन्ही कुटुंबासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता़. उत्तम पारखे यांना दुसऱ्यांदा शवागारात बोलावून घेतल्यानंतर त्यांना दुसरा मृतदेह दाखविला. तो पाहून आपण आपल्या आईलाच ओळखू शकलो नसल्याचा उत्तम पारखे मोठा धक्का बसला़. धिवर कुटुंबियांनी सयंम दाखवत दुसरा मृतदेहही पारखे यांना देण्यास मान्यता दिली़. त्यानंतर पारखे कुटुंबियांनीनंतर विमल पारखे यांच्यावर अंत्यसंस्कार केले़. पहिल्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणची अस्थी धिवर कुटुंबियांकडे देण्यात येणार आहे़. 

.......

चौकशी समिती स्थापन

या संपूर्ण प्रकरणाबाबत ससून रुग्णालयाचे प्रभारी उपअधिष्ठाता डॉ़ मुरलीधर तांबे यांनी सांगितले, की दोन्हीही महिलांचे निधन नैसर्गिकरित्या झाले होते़. त्यांच्या नातेवाईकांनी रितसर शुल्क भरुन रात्रीपुरते मृतदेह ठेवले होते़. अशाप्रकारे मृतदेहांची अदला बदल कशी झाली, याची चौकशी करण्यासाठी प्रा. डॉ. कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे़.त्यांचा अहवाल आल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत. ़़़़़नातेवाईक चुकीने दुसराच मृतदेह घेउन गेल्याने हा प्रकार घडला आहे. त्याबाबत शवागृहातील कर्मचाºयांची काही चूक झाली का याची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.  - डॉ. मुरलीधर तांबे, उप अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यू