शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सिंहगड रस्ता परिसरात भरदिवसा गोळीबार, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 20:15 IST

दोन विधी संघर्षित बालकांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे भरदिवसा एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या गोळीबारात सराईत गुन्हेगार ओंकार तानाजी लोहकरे (वय: १९ वर्षे, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी, पुणे) याचा मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार लोहकरे हा मित्र सागर ढेबेसोबत दुचाकीवर पाठीमागे बसून रायकर मळ्याकडून धायरी गावाच्या दिशेने निघाला होता. दरम्यान तो सिल्वर बर्च हॉस्पिटलजवळ आला असता, पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी ओंकार लोहकरे याच्या पाठीवर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मयत ओंकार व विधी संघर्षित बालक यांचे बालसुधारगृहात असताना वाद झाले होते, त्यावरून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. मात्र भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत ओंकार लोहकरे हा तरुण सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड