शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

’तो’ दिवस आजही स्मरणात! पुणेकरांनी जागवल्या पानशेत महाप्रलयाच्या थरारक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 07:00 IST

आज महाप्रलयाची ’षष्टब्दपूर्ती’, १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात उडाला होता हाहाकार

ठळक मुद्देमहाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवस आजही विसरू शकत नाही, अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या

पुणे: जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहातो. मग ज्यांनी अशा महासंकटांपैकी एखाद्या जरी संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल? अशाच एका महासंकटात पुणे शहर १२ जुलै १९६१ या दिवशी सापडले होते. पानशेत धरण फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला तो सांगायला अनेकांचे शब्दच अपुरे पडतात.. आज या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत...तो दिवसआजही विसरू शकत नाही....अशा शब्दांत पुणेकरांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवल्या.

पुराच्या महाप्रलयाची आठवण आल्यावर आजही अंगावर शहारे येतात  

मी त्यावेळी दुसरीत होतो. नारायण पेठेत पत्र्या मारूतीजवळ पाटणकरांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. रस्त्यालगत आमचं घर होतं. सध्याच्या कोतवालवाडा ( पूर्वी जिथं विष्णुशास्त्री चिपळूणकर राहातं असतं) त्यांच्यासमोर आमचा वाडा. तो दिवस उजाडला नेहमीसारखाच. पण नियतीनं दुसरंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्यादिवशी आमच्या घरी मी आई, माझी दोन भावंडं होती. तसेच आत्या, काका वगैरे पाहुणे आले होते. वडील नोकरीनिमित्त मुंबईला होते. सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले व धरणातून पाणी वाढू लागलं. अशा बातम्या येऊ लागल्या. नदीकाठी राहणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितलं. नंतर पाणी  वाढू लागलं अशा बातम्या यायला लागल्या.

नवीकाठी राहाणा-या लोकांना लगेच दुसरीकडे जायला सांगितले. नंतर पाणी वेगानं लकडीपूलावरून वाहू लागलं व म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आलं. जनसमुदाय आम्हाला घराबाहेर जा असं सांगत होता. आई स्वयंपाक करीत होती. आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. परंतु काकाच्या मदतीने आम्ही सर्व जोगेश्वरी मंदिराजवळ राहाणा-या आजीकडे गेलो आणि सुखरूप राहिलो. दुस-या दिवशी घरी येऊन पाहातो. तर घरात पाणी आल्याचं दिसलं. आई करीत असलेल्या पोळ्या चिखलात रूतून बसल्या होत्या. सगळीकडे चिखल झाला होता. वहया, पुस्तकं धान्य भांडीकुंडी सर्वच खराब झालं होतं. मुंबईच्या पेपरामधील बातमी वाचून वडील पुण्याला आले. पुराची आठवण आजही ताजी आहे. त्याची आठवण आल्यानंतर अंगावर शहारे येतात...अशी आठवण माधव ताटके यांनी सांगितली. 

त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत

मी त्यावेळी आठवीत होतो. शाळेत असतानाच आम्हाला पूर आल्याचे सांगण्यात आले आणि शाळा सोडून देण्यात आली. माती गणपतीजवळ घर असल्याने तिथे गेल्यावर गुडघ्याभर पाणी झाले होते. चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले. दुस-या दिवशी सकाळीच मावशीने आम्हा सर्वांना उठवले आणि पर्वतीवर पाठवले. पुन्हा धरण फुटले आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पाणी येणार अशी अफवा पसरली. त्या दिवशी पर्वतीवर पाहिली तेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत..अशा स्मृती प्रा. प्र,के घाणेकर यांनी जागविल्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणkhadakwasala-acखडकवासला