दौंडला सामाजिक उपक्रमांनी आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST2021-04-16T04:10:26+5:302021-04-16T04:10:26+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर भीमगीतांच्या ध्वनी लावण्यात आल्या होत्या. यावेळी कोरोनाचा नियम ...

Daundla celebrates Ambedkar Jayanti with social activities | दौंडला सामाजिक उपक्रमांनी आंबेडकर जयंती साजरी

दौंडला सामाजिक उपक्रमांनी आंबेडकर जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर भीमगीतांच्या ध्वनी लावण्यात आल्या होत्या. यावेळी कोरोनाचा नियम पाळून मानवंदनाही देण्यात आली. नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्ष विलास शितोळे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्यावतीने विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. याकामी पुतळाकृती समितीचे पदाधिकारी रवींद्र कांबळे, प्रकाश भालेराव, विकास कदम आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सतीश थोरात मित्र मंडळाच्या वतीने मास्क, सरबत, पाणी वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिर, रुग्णांना फळ वाटप , मास्क आणि सॅनिटायझर वाटप, त्याचबरोबर कोरोना उपयायोजनांची जनजागृती करण्यात आली.

Web Title: Daundla celebrates Ambedkar Jayanti with social activities