दौंड तालुका टंचाईसदृश

By Admin | Updated: August 20, 2014 22:38 IST2014-08-20T22:38:20+5:302014-08-20T22:38:20+5:30

राज्यातील 123 टंचाईसदृश तालुक्यांमध्ये पुणो जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे.

Daund taluka scarcity-related | दौंड तालुका टंचाईसदृश

दौंड तालुका टंचाईसदृश

दौंड : राज्यातील 123 टंचाईसदृश तालुक्यांमध्ये पुणो जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरी 4क्क् मिलिमीटर पर्जन्यमान असताना गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकाठची गावे सोडली, तर जिरायती भागात भर पावसाळ्यातही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 
12 गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील 12 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खडकी येथे पुणो-सोलापूर महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन शांततेत झाले. 
तालुक्यात चालू वर्षी पावसाने दिलेली ओढ व त्यामुळे जनावरांच्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील 12 गावांतील ग्रामस्थांसह महिलांनी तहसीलदार उत्तम दिघे, पाटबंधारे विभागाचे श्रीकांत बावडेकर यांना पाण्याची व्यवस्था होण्याबाबत निवेदने दिलेली होती. मात्र शासन स्तरावरुन व राजकीय स्तरावरुन संबंधितांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष हे आंदोलन करण्यात आले.
प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करुन कळवितो. मात्र त्यांना याबाबत काहीही न कळविल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. आंदोलकानी या वेळी संयम राखत आंदोलन शांततेच्या मार्गाने पूर्ण केले. या वेळी ग्रामस्थांना गोरख गाढवे, संजय काळभोर, डी. के. काळे, राजराजे शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 
नायब तहसीलदार बजरंग चौघुले व पाटबंधारे विभागाचे श्रीकांत बावडेकर यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. या वेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संरक्षणासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन न दिल्याने उपस्थित आंदोलकांची भ्रमनिराशा झाली. (वार्ताहर)
 
दौंड टंचाईग्रस्त जाहीर झाल्याने अंदाजे 37 कोटी 7क् लाख रुपयांची सवलत वीज, शिक्षण आणि शेतसारा यामार्फत मिळणार असल्याचे सूत्रंनी सांगितले.
तालुक्यात सरासरी 4क्क् मिलिमीटर पर्जन्यमान आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतक:यांसह कामगार, व्यापारी आणि समाजातील इतर घटक हतबल झाले आहेत. एकंदरीतच, तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाणी तसेच चा:याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांना पाणी सोडल्यामुळे या नदीकाठच्या गावांतील शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, तालुक्याच्या जिरायत पट्टय़ातील खोर, वासुंदे, कुसेगाव, पडवी, जिरेगाव, हिंगणीगाडा, रोटी या परिसरातील पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. (वार्ताहर)
 
तालुक्यातील सुमारे 1 लाख शेतक:यांना अंदाजे 1 लाख रुपये शेतसारा माफ होईल. कृषीपंपांच्या वीजबिलापोटी 5क् टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत बिगरशेतसारा कर शेतक:यांना भरावे लागणार आहे.
- उत्तमराव दिघे, 
तहसीलदार
 
4तालुक्यातील पहिलीपासून ते उच्च शिक्षित मुलांची संख्या अंदाजे 41 हजार असून खासगी अनुदानित आणि शासकीय अनुदानित विद्याथ्र्याना परिक्षा फी आणि प्रवेश फी असे अंदाजे 15 लाख रुपये माफ होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संगीता शिंदे यांनी सांगितले. 
 
दौंड : गुरुवारी (दि. 21) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत तांत्रिक कामाकरिता दौंड उपकेंद्रातील 132/22 के.व्ही. येथून बाहेर पडणा:या 22 के.व्ही रेल्वे व दौंड फिडरवरून विद्युतपुरवठा होणा:या सर्व भागांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली. 
 

 

Web Title: Daund taluka scarcity-related

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.