शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दौंड शुगर्स आणि अंबालिका कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रपंच फुलले- दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 19:59 IST

यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत (it raid in pune, pune it raid, ajit pawar, income tax raid in pune)

इंदापूर (पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी इंदापूर तालुक्यासह व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दौंड शुगर, अंबालिका यासारख्या साखर कारखान्याची निर्मिती केली. इतर कारखांन्यापेक्षा प्रतिटनाला चारशे-पाचशे रुपये दर अधिकचा देऊन, शेतकऱ्यांचे प्रपंच चांगले फुलवण्याचे काम केले, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन केले.

इंदापूर येथे शनिवारी ( दि. ९ ) आयोजित  पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत. इंदापूर सहकारी साखर कारखाना व दौंड तालुक्यातील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना काय दर देतो, अजित पवार यांचे कारखाने काय दर देतात, हे तमाम शेतकरी बंधूंना माहिती असल्याचे भरणे यावेळी म्हणाले.

पवार कुटुंबियांची बदनामी कधीही चुकीच्या पद्धतीने होऊ शकत नाही. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी हे कुटुंब अहोरात्र वेळ खर्च करते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आखलेल्या धोरणामुळे सुखी होत आहे. दौंड शुगर, अंबालिका या साखर कारखान्यांचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटविण्यासाठी महत्वाची भूमिका आहे. याचा विचार सर्व स्तरातून होणे गरजेचे असल्याचे भरणे म्हणाले.

तालुक्यातील जनतेच्या आरोग्यविषयक बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी आपण स्वत: यंत्रणा तयार केली आहे. ती टीम मुंबईमध्ये २४ तास कार्यरत आहे. शासनाकडून मिळणारा आरोग्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असेही आवाहन यावेळी भरणे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSugar factoryसाखर कारखानेIncome Taxइन्कम टॅक्सIndapurइंदापूरBaramatiबारामती