शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 18:58 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करणार होते. परंतु पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आले. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले. शनिवारी राज ठाकरेंची सभा मुठा नदी पात्रात होणार होती. आता पुण्यात रविवारी २२ मेला सभा होणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे. पण उद्यापर्यंत सभेचे ठिकाण आणि वेळ याची अधिकृत माहिती मनसेकडून जाहीर करणार येईल असेही त्यांनी सांगितले आहे. सकाळच्या वेळेत सभा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे.    

येत्या १० दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला असल्याचे सुत्रांकडून समजल होत. स्वतः राज ठाकरे पुण्यातील सभेबद्दल माहिती देतील असंही सांगण्यात आले होते. २१ मेला होती सभा

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवारी २१ मेला डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसे कडून करण्यात आले होते. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली होती. पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणSocialसामाजिक