शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

चोरांनी दशक्रिया विधीचे साहित्यही सोडले नाही, ओंकारेश्वर घाटावर चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:15 IST

साहित्यात तांबे, चांदी, पितळे आदी भांड्यांचा समावेश

ठळक मुद्देएका वर्षात तीन वेळा झाली चोरी

पुणे: आज सकाळी ओंकारेश्वर घाटावरील हॉलमध्ये असणाऱ्या तांबे, चांदी, पितळ आदी भांडयाची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घाटावरील गुरुजी प्रशांत मोघे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. हॉलचे शटर उचकटून तेथे चांदी, तांबा व पितळाचे सुमारे ४० तांबे,४०  ताम्हण, पळी भांड्याचे २० सेट, पराती पातेले, चांदीचा तांब्या,3 भांडी,2 ताम्हण चांदीचे आणि एक पळी, येवढे साहित्य चोरीला गेल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत.

ओंकारेश्वर घाटावर नागरिक दशक्रिया आणि अन्य विधीसाठी येत असतात. त्यासाठी या साहित्याची गरज असते. इथे एक हॉल असल्याने सर्व साहित्य त्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवले जाते. सकाळी सर्व विधी करून झाल्यावर हॉल पूर्णपणे बंद करून गुरुजी जातात. त्यामुळे कोणालाही त्याठिकाणी लक्ष देण्याची गरज नसते. तरीही एका वर्षात तीन वेळा चोरी झाल्याचे गुरुजींनी सांगितले आहे. सुरुवातीला हॉलचे पत्रे उचकटून भांडी पळवून नेली होती. आता शटर उचकटून भांडी चोरण्यात आली आहेत.

गुरुजी मोघे म्हणाले की, घाटाच्या शेजारी शनिवार पेठ पोलीस चौकी आहे. आतापर्यंत एक वर्षात तीन वेळा चोरी होऊनही पोलिस दखल घेत नाहीत. आजही सकाळी चोरी झाल्यावर आम्ही चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी फक्त हवालदार येउन फेरफटका मारून गेले. आमचे अधिकारी आल्यावर बघू असे आम्हाला सांगितले. पण कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेतली नाही. तरी ह्या चोरीचा तपास करावा. तेथे सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेtempleमंदिरPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका