अंधाराचे बेट नाटकाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:35+5:302021-03-04T04:18:35+5:30

पुणे : ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स निर्मित अंधाराचे बेट या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सुदर्शन रंगमंच शनिवार पेठ येथे ६ ...

Dark Island Drama Experiment | अंधाराचे बेट नाटकाचा प्रयोग

अंधाराचे बेट नाटकाचा प्रयोग

पुणे : ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स निर्मित अंधाराचे बेट या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सुदर्शन रंगमंच शनिवार पेठ येथे ६ मार्चला सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

नाटकाचे प्रवेशमूल्य ऐच्छिक असून प्रेक्षकांनी नाटकाचा आस्वाद घ्यावा, अशी माहिती कलाकार पार्थ खाडिलकर यांनी दिली आहे. अंधाराचे बेट या नाटकाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्यनाट्य स्पर्धा, भारत रंग महोत्सव यामध्ये नाटकाचे सादरीकरण झाले आहे. कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे हे नाटक. विशेषतः कित्येक तरुण नाट्य कलाकारांना स्वतःचीच गोष्ट वाटणारं ही कथा त्यांना जेवढी भावुक करते, तितकीच हसवते आणि प्रेरितही करते.

श्रीकांत प्रभाकर यांनी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. नाटकामध्ये सिद्धांत उपासनी, ओंकार करळे, अक्षयकुमार मांडे, हर्षवर्धन वाघमारे, विनोद चव्हाण, शुभांगी जाधव, मिथाली हिरेमठ, श्रीकांत प्रभाकर, प्रतीक्षा भारती आदी कलाकार असणार आहेत.

Web Title: Dark Island Drama Experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.