शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

धायरीत भरधाव डंपरने 6 वाहनांना उडवले, 8 जखमी तर 2 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 22:57 IST

धायरीत मद्यधुंद डंपरचालकाने पुढे असणाऱ्या 4 दुचाकीसह 6 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे : धायरीत मद्यधुंद डंपरचालकाने पुढे असणाऱ्या 4 दुचाकीसह 6 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही अपघात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी डंपरचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, धायरी गावातून येताना डंपर वेगाने होता. रस्त्यावर गर्दी असल्याने पुढे जायला जागा नव्हती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपरचालकाना गाडीचा वेग आवरता आला नाही. उब-या गणपतीजवळ त्याने पुढे जाणा-या दुचाकींना धडक देण्यास सुरुवात केली. त्याने एकापाठोपाठ ८ दुचाकी गाड्यांना धडक दिल्यानंतर धायरेश्वर मेडिकलजवळ एक दुचाकी चाकाखाली अडकल्याने डंपर थांबला. डंपरची धडक इतकी जोरात होती की, अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाला. त्यांना काही कळायच्या आत ते रस्त्यावर कोसळले. जखमींना जवळच्या रुग्णालयात तर काहींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगला चोप दिला. या अपघाताने तेथे एकच गोंधळ उडाला होता. याची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात चार दुचाकी, एक सहा आसनी रिक्षा, छोटा हत्ती यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत करून काही वेळात वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात