शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनीच बुजविले पुणे-नगर महामार्गावरील धोकादायक खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:07 IST

पुणे-नगर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने अनेक दुचाक्यांचे अपघात होऊन अनेकांना इजा झाल्याचे निदर्शनास येत होते

कोरेगाव भीमा (पुणे): प्रत्येक तालुक्यात विविध कामासांठी वेगवेगळे विभाग असताना कोणत्याही विभागाचे काम असेल तरी त्याचा ताण पोलिसांवरच येत असतो. त्यामुळे खाकीकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन खूप वेगळा असताना अनेकदा खाकीतील माणुसकीचे दर्शन देखील नागरिकांना होत असते. मात्र अशाच एका आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यामुळे शिक्रापुरातील पोलिसांच्या खाकी पलीकडील माणुसकीचा प्रत्यय नागरिकांना आला असून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे. 

पुणे-नगर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने अनेक दुचाक्यांचे अपघात होऊन अनेकांना इजा झाल्याचे निदर्शनास येत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा विनंती करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नगरिकांची या खड्यातून मुक्तता करण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मिलिंद देवरे, गणेश शेंडे, ट्राफिक वार्डन किरण थोरात, बाळकृष्ण शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील धोकादायक खड्डा बुजविण्याचा निर्णय घेत स्वतः सिमेंट मिश्रित वाळू व खडी त्या ठिकाणी आणून हातामध्ये फावडे खड्ड्यात भर टाकून खड्डा बुजविला.

दरम्यान येथे खाकी कपड्यांवरील पोलीस हातात फावडे घेऊन खड्डा बुजवित असल्याचे पाहून नागरिक व प्रवाशांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी वाहने थांबवून पोलिसांच्या कार्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. तर यावेळी बोलताना येथील खड्ड्यामध्ये अनेक दुचाकी चालक घसरून पडल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही सामाजिक भावनेतून खड्डा बुजविला असल्याचे पोलीस नाईक मिलिंद देवरे यांनी सांगितले.

रस्ता कोणाचा अन् दुरुस्तीचा ताण कोनावर?

पुणे-नगर महामार्गाची दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना हा विभाग मात्र जाणीवपूर्वक रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली कानाडोळा करताना दिसत असते. पुणे नगर महामार्गावरून अनेक विभागाचे अधिकारी प्रवास करत असतात. मात्र पोलिसांना खड्ड्यातील अपघातांची दया आल्याने त्यांनी पुढाकार घेत खड्डे बुजविले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील खड्डे दिसत नाही का, असा सवाल नागरिक करत असताना रस्ता कोणाचा अन् दुरुस्तीचा ताण कोणावर असा सवाल उपस्थित होत आहे.

आमच्या कामापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा

खड्डे बुजविण्याचे आमचे काम नाही ही वस्तुस्थिती असताना आमच्या कामापेक्षा आम्हाला नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याने पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने याआधीही महामार्गावरील खड्डे बुजवले असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातShikrapurशिक्रापूर