भंगाराच्या गोदामाला भीषण आग

By Admin | Updated: April 28, 2017 05:52 IST2017-04-28T05:52:15+5:302017-04-28T05:52:15+5:30

जेजुरी-सासवड मार्गावर भर मध्यवस्तीत असलेल्या भंगार गोदामाला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागून लाखो

Dangerous fire in the warehouse | भंगाराच्या गोदामाला भीषण आग

भंगाराच्या गोदामाला भीषण आग

जेजुरी : जेजुरी-सासवड मार्गावर भर मध्यवस्तीत असलेल्या भंगार गोदामाला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल खाक झाला. जेजुरी नगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन, नगरसेवक, ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
गेल्या कित्येक वषार्पासून या ठिकाणी दोन एकराच्या जागेमध्ये हे गोदाम असुन या ठिकाणी पुणे जिह्यातुन भंगार माल आणला जात होता. आज दुपारी बारा वाजण्याच्या आजुबाजुच्या परिसरातील रहिवाशांना या भंगारच्या गोदामामधुन मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिस स्टेशन व नगरपालिकेशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच तत्काळ जेजुरी स.पो.निरिक्षक रामदास वाकोडे व नगरपालिकेचे कर्मचार्यां्सह मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य जगताप, महेश दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेजुरी पालिकेचे दोन बंब, सासवड नगरपालिका, निरा, बारामती, सोमेश्वर, पुणे आदी ठिकाणाहून अग्निशामक दलाचे आठ बंब मागवण्यात आले.
या गोदामाच्या शेजारी भारत पेट्रोलियमचा पंप तर आजुबाजुला नागरी वस्ती, गुरांचा गोठा असल्याने सर्वांचीच धावपळ झाली. नगरपालिका कर्मचार्यांननी पोलिसांच्या मदतीने येथील नागरिकांना व गुरांना सुरक्षित ठिकाणी हालवून घरांतील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या गोदामामध्ये केमिकल व रसायनांचे रिकामे झालेले लोखंडी व प्लॅस्टिकचे कॅन, बॅरल आगीच्या भक्षस्थानी आल्याने त्याचे मोठे स्फोट होत होते.
जेसीबीच्या सहाय्याने गोडावूनच्या संरक्षक भिंती पाडून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता करुन बंब आगीच्या ठिकाणी आणण्यात आले. गोदामाला लागूनच पन्नास फुटांवर पेट्रोलपंप असलल्याने तेथे विशेष दक्षता घेण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी प्रांत अधिकारी संजय असवले, तहसिलदार सचिन गिरी, नायब तहसिलदार संजय काटकर, बारामती उपविभागाचे अतिरिक्त अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलिस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील, स.पो.निरीक्षक रामदास वाकोडे, उप निरिक्षक गणेश पिंगुवाले, श्रीकांत देव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण,जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भुमकर आदी अधिकारी आग विझेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.
नगरसेवक सचिन सोनवणे,अजिंक्य देशमुख,सामाजिक कार्यकर्ते दादा मुलाणी, माजी नगरसेवक सुधीर गोडसे, हेमंत सोनवणे व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.

Web Title: Dangerous fire in the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.