ओबीसी आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:38+5:302021-09-02T04:25:38+5:30
पुणे : महाराष्ट्रात इतर मागास वर्ग (ओबीसी) जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे. तसेच, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. त्याचबरोबर ...

ओबीसी आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
पुणे : महाराष्ट्रात इतर मागास वर्ग (ओबीसी) जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे. तसेच, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. त्याचबरोबर ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण सुरू करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी धरणे आंदोलन केले. ओबीसींच्या जनगणनेशिवाय किंवा इम्पिरिकल डाटा राज्य सरकारला मिळाल्याशिवाय पुणे महापालिकेची निवडणूक संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही. राज्य सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा यासाठी आरपारची लढाई लढण्याची तयारी आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मोहिनी रणदिवे, साजिद सय्यद, अशोक फाजगे, संदीप कारेकर, ज्योतिबा नरवडे आदी उपस्थित होते.