”दहिभात, लिंबू, हळद-कुंकू आणि नारळ..”; पुणे जिल्ह्यातील या गावात भर दिवसा जादूटोणा? घटनेचे सीसीटीव्ही व्हायरल
By किरण शिंदे | Updated: December 5, 2025 11:22 IST2025-12-05T11:20:32+5:302025-12-05T11:22:20+5:30
दरम्यान त्याचं हे कृत्य पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला. यावर त्याने आपण मुंबईतून आल्याचा सांगितलं. मात्र त्याने ही पूजा का केली, कुणासाठी केली याबाबत कुठलीही माहिती दिली नाही.

”दहिभात, लिंबू, हळद-कुंकू आणि नारळ..”; पुणे जिल्ह्यातील या गावात भर दिवसा जादूटोणा? घटनेचे सीसीटीव्ही व्हायरल
किरण शिंदे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका गावात जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. बंद घरासमोर एक व्यक्ती जादूटोणा करत असल्याचा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावात हा संपूर्ण प्रकार घडला. गावातील एक जुने, बंद घर, घराच्या दाराजवळ दही-भात, लिंबू, हळदकुंकू आणि नारळ ठेवून पूजा करताना एक पुरुष आणि चेहरा झाकलेल्या अवस्थेतील एका महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यातील पुरुषाच्या हातात पिशवी असून तो पिशवीतील वस्तू मांडताना दिसतो. नंतर लिंबूवर हळद-कुंकू लावून त्याठिकाणी नारळ फोडल्याचंही CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
दरम्यान त्याचं हे कृत्य पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला. यावर त्याने आपण मुंबईतून आल्याचा सांगितलं. मात्र त्याने ही पूजा का केली, कुणासाठी केली याबाबत कुठलीही माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये मात्र जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. आणि यातूनच हा जादूटोण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान भर गावात आणि भर दिवसा अशा प्रकारचं विचित्र कृत्य झाल्यामुळे त्या गावात भीतीच वातावरण पसरला आहे. आणि त्यात या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही वायरल झाल्यानंतर तर चर्चेला आणखी जोर आला आहे. स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हा संपूर्ण प्रकार जादूटोण्याचा आहे की कुणाला धमकवण्यासाठी केलेली ही युक्ती आहे याचाही तपास पोलीस करतायेत.