‘दगडूशेठ' गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या मातोश्रींचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 13:57 IST2020-05-05T13:56:01+5:302020-05-05T13:57:31+5:30
पुण्याच्या गणेशोत्सवाला विधायक वळण देणाऱ्यांमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या थोर गाणपत्य स्व. तात्यासाहेब गोडसे यांच्या त्या पत्नी होत.

‘दगडूशेठ' गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या मातोश्रींचे निधन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या मातोश्री ताराबाई गोडसे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवाला विधायक वळण देणाऱ्यांमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या थोर गाणपत्य स्व. तात्यासाहेब गोडसे यांच्या त्या पत्नी होत. ट्रस्टतर्फे आयोजित महिलांशी निगडीत उपक्रमांमध्ये ताराबाई गोडसे यांचा सक्रिय सहभाग असे. तसेच जास्तीत जास्त महिलांनी धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असा आग्रह धरुन त्या नेहमी प्रयत्नशील होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळासह पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.