दादावाडी कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST2021-04-14T04:10:15+5:302021-04-14T04:10:15+5:30

कात्रज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रवीण चोरबेले व अशोक गुंदेचा यांच्या सहकार्याने दादावाडी मंदिर ...

Dadawadi Kovid Center started | दादावाडी कोविड सेंटर सुरू

दादावाडी कोविड सेंटर सुरू

कात्रज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रवीण चोरबेले व अशोक गुंदेचा यांच्या सहकार्याने दादावाडी मंदिर येथे ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर 80 बेडच्या सुविधेचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, आगामी काळात बेडची संख्या 180 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

सारसबाग शेजारी असलेल्या दादावाडी मंदिर येथे कोरोना कोविड सेंटर सुरू करण्यात आले. पाडव्याच्या मुहूर्तावर हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. ना नफा-ना तोटा या तत्त्वावर हे सेंटर उभारण्यात आले असून, या ठिकाणी 80 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेंटरच्या उद्घाटनाला नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर, प्रवीण चोरबेले, दादावाडीचे अध्यक्ष भवरलाल जैन, जितो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, अचल जैन, हे कोविड सेंटरचे प्रमुख अशोक हिंगड, ललित गुंदेचा, राजेन्द्र सोलंकी, अशोक गुंदेचा, भवरलाल जैन, राजेंद्र बाठिया, सहायक पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, सोमनाथ जाधब, अमोल रसाळ, नगरसेवक प्रवीण चोरबेले, दादावाडीचे ट्रस्टी उपस्थित होते.

यावेळी ललित गुंदेचा यांनी प्रास्ताविक केले आणि सेंटर बद्दल माहिती दिली. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे अशोक हिंगड यांनी सांगितले. कोविड सेंटरची किती आवश्यकता आहे आणि ते कसे चालवले पाहिजे, याची माहिती अचल जैन यांनी सांगितली. ओमप्रकाश रांका यांनी या कोविड सेंटरची मर्यादा 80 वरून आवश्यकता पडल्यास 180 देखील केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. राजेंद्र बाठिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

Web Title: Dadawadi Kovid Center started