शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 17:30 IST

दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती.

पुणे : सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे न आल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पोलीस पुरेशी कोठडी दिली आहे, असे नमूद करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची न्यायालयीने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हा आदेश विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी दिला. आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.या प्रकरणातील आरोपीपींची सीबीआय कोठडी संपत असल्याने दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते.         आरोपी हे मोठ्या कटात सहभागी होते. पुनाळेकर यांनी यापूर्वी अटक आरोपींना पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला आहे. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. तसेच पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटाचे अद्याप विश्लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट बाकी आहे. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी केली.          आतापर्यंत सादर केलेल्या तिन्ही रिमांड रिपोर्टमध्ये कोठडीची कारणे सारखी आहेत. सीबीआयने कोठडीच्या कालावधीत कोणत्याही नवीन मुद्द्यावर तपास केलेला नाही. तसेच कोठडीचे मुद्देदेखील समाधानकारक नाहीत. प्रत्येक आरोपीच्या वेळी दुचाकी जप्त करण्याचे कारण सीबीआय देत आहे. मात्र अद्याप ती दुचाकी जप्त झालेली नाही. पुरेशी कोठडी मिळाली असल्याने आरोपींना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.      दरम्यान सीबीआयने आज एक गुप्त अहवाल न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सात जून रोजी सुनावणी होणार आहे. दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर यान दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने त्यांना २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. कळसकर याच्याच जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आरोपींना प्रथम १ जूनपर्यंत व नंतर ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही मुदत संपल्याने आज पुनाळेकर व भावे या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने आरोपींच्या कोठडीची मुदत १४ दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. मात्र, रिमांंडची कारणे तेच असल्याने ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते.  

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभाग