शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हेच्या पुरात ' सनकी ' युवकाची उडी, युवकांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:39 IST

दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीमध्ये एका युवकाने उडी घेतल्याचा प्रकार दुपारी घडला....

ठळक मुद्देतालुक्यातील मळद येथील घटना

बारामती : बारामती तालुक्यातील मळद येथे पुरामुळे दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीमध्ये एका युवकाने उडी घेतल्याचा प्रकार दुपारी घडला. स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालुन या युवकाला मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले.या युवकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारपासून कऱ्हा नदीला आलेला पुर पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील पुलांवर गर्दी होत आहे.यामध्ये पुराचे छायाचित्र,सेल्फी काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलिसांना इतर बचाव कार्य करण्यापेक्षा पुलावर धोकादायक पध्दतीने फोटो काढणाऱ्यांसह सेल्फी घेणाऱ्यांना आवरताना दमछाक झाली.खंडोबानगर येथे नदीच्या पुलावर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी अशीच हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला पोलिसी हिसका दाखविला.त्यानंतर पुलावरील हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांनी पोलिसांची धास्ती घेवुन काढता पाय घेतला.मात्र, ग्रामीण भागात हुल्लडबाजी सुरुच होते.मळद येथील नदीच्या पुलावरुन ३० वर्षीय विनोद रणधीर युवकाने गुरुवारी(दि २६) दुपारी नदीच्या पुरामध्ये उडी घेतली.यावेळी पुलाच्या दोन्ही बाजुला मोठा पोलीस बंदोबस्त होता.मात्र, मध्यभागी पोलीस नसल्याचे पाहुन विनोद थेट पात्रातील पुरात झेपावला. यावेळी पोलिसांसह उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.यावेळी उपस्थित असणाऱ्या युवकांनी मात्र, त्याला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. सतर्कता बाळगत तातडीने विनोदला बाहेर काढले.यावेळी विनोदवाहत जावुन अवघ्या १५० फुट असणाऱ्या स्मशानभुमीपर्यंत पोहचला होता,तोच पाठीमागुन पुरात उड्या घेतलेल्या मुलांनी त्याला गाठले.त्यानंतर त्यालाबाहेर काढण्यात आले.

मनोज शिंदे,सुजीत गजरमल,रोहन लोंढे,अनिकेत भोसले,बंटी खोमणे,महेश साबळे,अमर माने आदी युवकांनी धाडस केल्याने विनोदचा जीव बचावला. विनोद याला चांगले पोहता येते.मात्र, तो सनकी असुन आज मद्याच्या अंमलाखाली त्याने पुरात उडी घेतल्याची याठिकाणी चर्चा होती. नदीच्या पुरातुन विनोद यास बाहेर काढल्यानंतर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.————————————— ...मला देवाला जायचे आहे,पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विनोद पुरता घाबरला.त्याने कारवाई होवु नये, यासाठी गयावया करण्याचा प्रयत्न केला. मला माफ करा,मला मारु नका. मला देवाला जायचे आहे,देवाच्या पाया पडायचे आहे,अशी विनवणी तो पोलिसांना करत होता.यावेळी पोलिसांनी त्याला तुला कोणी मारत नाही, तू फक्त बरोबर चल,असे सांगुन समजुत घालत बरोबर नेले.

टॅग्स :BaramatiबारामतीriverनदीfloodपूरPoliceपोलिस