शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तौत्के चक्रीवादळाने पुणे शहरात मोठे नुकसान, वादळी वाऱ्याने ४० वृक्ष कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 20:45 IST

ग्रामीण भागातही घरांचे नुकसान

ठळक मुद्देशहरात आकाश ढगाळ राहून सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा पुणे शहर व जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून आला आहे. पुणे शहरात सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेगवान वाऱ्यामुळे ४० झाडे पडली. बारामती येथे महावितरणाचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. तर खेड तालुक्यात ८७ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरात सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीत पार्क केलेल्या मोटारीवर झाड कोसळून मोटारीचे नुकसान झाले. पुणे शहरात शनिवारी रात्री जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती. रात्री ९ वाजल्यापासून  सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ११ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. दुपारनंतर वाऱ्याचा वेग जसा वाढला. ताशी ५० ते ५५ किमी वेगाने वारे वाहू लागले, तसे झाडे उन्मळून पडण्याचा वेगही वाढला. रविवारी कडक लाॅकडाऊन त्यात जोरदार वारे वाहत असल्याने पुणेकर आज नेहमीपेक्षा कमीच बाहेर पडलेले दिसून आले. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.१ मिमी, पाषाण येथे ३.८ मिमी. तर लोहगाव येथे ९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

शहरातील जवळपास सर्व भागात झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात प्रामुख्याने मुकुंदनगर, येरवडा, हडपसर, धनकवडी, कल्याणीनगर, कात्रज, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, सोलापूर बाजार, विश्रांतवाडी, सिहंगड रोड, नवी पेठ, कोरेगाव पार्क, गंज पेठ, सारसबाग, टिंगरेनगर या भागात झाडपडीच्या घटना घडल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत अशा ४० घटना घडल्या. पुणे शहरात आकाश ढगाळ राहून सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ होते. सायंकाळच्या सुमारास काही वेळ पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे२.३, लोहगाव १.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. 

पणजीत १२४ मिमी पावसाची नोंद

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पणजी शहराला बसला असून तेथे सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी ३६, कोल्हापूर १४, महाबळेश्वर ३, सांगली ७, सातारा ३, औरंगाबाद २०, परभणी २, अमरावती ७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक