शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सायकल शेअरिंगला चोरीचे ‘ग्रहण’; लॉक तोडण्याचेही प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 01:17 IST

प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात गेल्या वर्षी सायकल शेअरिंग योजना सुरू झाली. या योजनेला चांगला प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे.

- श्रीकिशन काळे

पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात गेल्या वर्षी सायकल शेअरिंग योजना सुरू झाली. या योजनेला चांगला प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु, काही ठिकाणी सायकलींचे लॉक फोडणे, सायकल चोरणे, सायकल कुठेही टाकून देणे आदी प्रकार होत असल्याने संबंधित कंपनी हैराण झाली आहे. त्यामुळे या योजनेत नव्याने दाखल करण्यासाठी आणलेल्या नवीन ५ हजार सायकली चाकण येथे प्रतीक्षेत आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ५ डिसेंबर २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर शहरातील फर्ग्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कोथरूड, विमाननगर, कॅम्प, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, सर्व पेठांमध्ये सायकल योजना सुरू झाली.

महापालिकेच्या वतीने सायकल स्टॅँड आणि ठिकठिकाणी सायकल पार्किंगचे फलक लावण्यात आले. शहरात ओफो, झूमकार पेडल आणि मोबाईक या तीन कंपन्यांनी सायकली दिल्या आहेत. शहरात एकूण २५०० सायकली ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. परंतु, सध्या त्यातील २ हजारच रस्त्यावर आहेत. सुमारे ५०० सायकलींची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे त्या दुरुस्तीसाठी आणि काही भंगारात टाकून दिल्या आहेत, अशी माहिती मोबाईक सायकल कंपनीचे सिटी आॅपरेशन्स हेड आदर्श केदारी यांनी ‘लोकमत’ला दिली.वस्ती परिसरात सायकल चोरीचे प्रकारज्या भागात वस्ती आहे, त्या ठिकाणच्या सायकली चोरीला जात आहेत. कारण वस्तीमधील लहान मुले सायकली घेऊन जातात आणि दगडाने लॉक तोडतात. असे प्रकार येरवडा, मिठानगर, रामनगर, लोहियानगर (स्वारगेट), दत्तवाडी परिसरात होत आहेत. येरवड्यात तर एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने १२ सायकली स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्या पैसे दिल्याशिवाय देणार नाही, असे म्हणत होता. तेव्हा कंपनीचे लोक पोलिसांना घेऊन गेले आणि सायकली सोडवून आणल्या.

चोरीच्या प्रकारावर पोलीसही हतबलचोरीला जाऊ नये आणि तोडफोड होऊ नये, यासाठी कंपनीच्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. परंतु, पोलिसांचे म्हणणे आहे की, लहान मुलांना शिक्षा करता येत नाही. त्यामुळे त्यांना धाक राहत नाही. खरं तर त्यांच्या पालकांमध्ये याबाबत जागृती झाली पाहिजे. तरच यावर रोख लागू शकतो.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस