सायबर पोलिसांनी वाचवले बँक ग्राहकांचे सव्वादोनशे कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:16+5:302021-03-17T04:13:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : या सायबर फ्रॉडमध्ये बँक खात्याचा डाटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या आयटी इंजिनिअरांचा सहभाग असल्याने ...

Cyber police saves Rs | सायबर पोलिसांनी वाचवले बँक ग्राहकांचे सव्वादोनशे कोटी

सायबर पोलिसांनी वाचवले बँक ग्राहकांचे सव्वादोनशे कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : या सायबर फ्रॉडमध्ये बँक खात्याचा डाटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या आयटी इंजिनिअरांचा सहभाग असल्याने संपूर्ण बँकिंग क्षेत्राला यामुळे हादरा बसला आहे. वेगवेगळ्या फ्रॉडमुळे बँकेतील पैसा सुरक्षित नसल्याचा म्हटले जात असताना आता बँकेतील खात्यांचा डाटाही असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरुण वर्मा हे चौघे बँक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या कंपनीमधील व्यक्ती या कटामध्ये सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही टोळी औरंगाबाद येथील एका बड्या व्यक्तीला ही माहिती व पैसे घेऊन विक्री करणार होते. त्यांची मध्यस्थ अनघा मोडक होती. त्यानुसार २५ लाख देऊन जवळपास अडीच कोटींचा डाटा विक्री करणार होता. सुधीर भटेवरा, राजेश शर्मा, परमजितसिंग संधु, अनघा मोडक यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. याप्रकरणात सोनु (हैदराबाद) आणि दीपकसिंग ऊर्फ अजय (रा. वापी) हे दोघे जण फरार आहेत.

डॉरमंट बँक खात्यामधील रक्कम गैरमार्गाने मिळवण्यासाठी व ही रक्कम ज्या आयसीआयसीआय बँकेतील हिट जेम्स अकाऊंटमध्ये वर्ग करुन ही रक्कम कशाप्रकारे काढून घेणार होते, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. न्यायालयाने ८ जणांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Cyber police saves Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.