शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:45 AM

: फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे.

- विशाल शिर्केपुणे : फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.फोर-जी जमान्यात कॉलची प्राथमिक सुविधादेखील पुरेशी सक्षम नसल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. तिच अवस्था फोर-जी इंटरनेट स्पीडबाबत दिसून येत आहे. आपण फाईव्ह-जी इंटरनेट स्पीडच्या तयारीला लागलो आहोत. मात्र फोर-जी इंटरनेटचा स्पीड खरेतर किती काळ आणि कधी मिळतो हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, अशी स्थिती आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने इंटरनेट-ब्रॉडबँड संबंधीच्या तक्रारी आणि इंटरनेट स्पीड कमी असल्याच्या तक्रारी असे दोन स्वतंत्र रकाने केले आहे. त्यानुसार यावर्षी आॅक्टोबर अखेरीस एअरटेलच्या इंटरनेट सेवेबाबत तक्रार असणाºया ३२२ ग्राहकांनी अर्ज केला होता. तर इंटरनेटला खराब स्पीड असल्याचे १४५ ग्राहकांनी सांगितले होते. आयडियाच्या इंटरनेट सेवेबाबत आक्षेप घेणाºया ६२ आणि इंटरनेट खराब स्पीडबाबत २३ ग्राहक पुढे आले होते. संगणकसेवेबाबत आक्षेप घेणाºया आणि खराब इंटरनेट स्पीड असल्याच्या कारणावरून जिओच्या ४५ आणि ११७ ग्राहकांनी आणि व्होडाफोनच्या १२६ आणि ६४ जणांनी तक्रार दाखल केली होती. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरचे शाखा अध्यक्ष विजय सागर म्हणाले, ग्राहक पंचायतीकडे मोबाईलला इंटरनेट स्पीड नसल्याबाबत दररोज एक दूरध्वनी येतो. त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यास सांगण्यात येते. मात्र, त्यातील दहा टक्के ग्राहकदेखील पुढे तक्रारीसाठी जात नाहीत.इंटरनेट सेवेबाबतच्या २०१६ आणिआॅक्टोबर २०१७ पर्यंतच्या तक्रारीतक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जिओ व्होडाफोनइंटरनेट सेवा ६७/१८ ६४९/३२२ ११५/६२ ३/४५ २३४/१२६खराब इंटरनेट १७/२० १४८/१४५ ४८/२३ ९/११७ ५२/६४ग्राहकांची परवानगीनसताना सेवा सुरू १३/१२ ९०/५७ ७४/७८ ०/१ १२३/१३१पोर्टेबिलिटीला मिळेना दादमोबाईल क्रमांकदुसºया कंपनीमध्ये पोर्ट करण्यासाठी कोणत्याच कंपन्या उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. नवीन मोबाईल क्रमांक सुरू करण्यासाठी केवळ आधार कार्ड दिल्यास पुरेसे ठरते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत नंबर मोबाईल कंपन्या करतात. मात्र मोबाईल क्रमांक सहजासहजी पोर्ट होत नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर एअरटेलच्या ८१९, आयडिया ५८९, जिओ २४ आणि व्होडाफोनच्या १ हजार २७५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षी (२०१६) देखील आयडिया ५२२ आणि व्होडाफोनच्या ८१७ तक्रारी दाखलझाल्या होत्या.मोबाइल कॉल ड्रॉप आणि इंटरनेट स्पीड कमी असण्याचे प्रमाण खूप आहे. मोबाइल कंपन्या दररोज १-२ जीबी डाटा मोफतच्या अनेक योजना जाहीर करते. मात्र, आपला वापर किती झाला याची नोंद करण्याची सुविधा नाही. तसेच इंटरनेटचा स्पीड मोजता येत नाही. याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार करूनही त्याचे उत्तर दिले जात नाही. माझ्याकडे तसा पत्रव्यवहार पडून आहे. दुसरीकडे, मोबाइल कंपन्यांचे अधिकारी ग्राहकांना दाद देत नाहीत. मग ग्राहक तक्रार करणार कोणाकडे. - विलास लेले,अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष, महाराष्ट्र

टॅग्स :MobileमोबाइलPuneपुणे