ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:03 IST2018-03-01T07:03:09+5:302018-03-01T07:03:09+5:30

आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते.

 Customer demand: Online sale of Goa for Holi | ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री

ग्राहकांची मागणी : होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री

स्वप्निल हजारे 
पिंपरी : आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्त्व कायम आहे. पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोवºयांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.
देशभरात खेड्यांसह शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी पेटवून मनोभावे अग्नीदेवतेची पूजा केली जाते. होळीच्या ठिकाणी सुवासिनी नैवेद्य दाखवतात. वर्षानुवर्षे या सणाचे महत्त्व टिकून आहे. वाईट विचार नष्ट करून चांगल्या विचारांचा अंगीकार करणे या भावनेतून होळीचा सण साजरा केला जातो. होळीसाठी लागणा-या साहित्याला विशेष म्हणजे गाईच्या शेणापासून बनविण्यात येणा-या गोव-यांना फार महत्त्व असते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना गोव-या उपलब्ध होत नाही. विविध वस्तूंची आॅनलाईन विक्री करण्यात अग्रेसर असणा-या काही कंपन्यांनी चक्क गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू केली आहे. होळीप्रमाणेच धार्मिक विधी, होमहवन याकरिता गोव-यांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आॅनलाइन गोव-या विक्रीची जाहिरात केली आहे.
खेड्यातील गोव-यांना मागणी-
खेड्यामध्ये घरोघरी शेतक-याकडे गाई, म्हशी असतात. या जनावरांच्या शेणापासून गोवºया तयार करून स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरात आणल्या जातात. उन्हाळ्यात घराच्या आवारात अथवा शेतात महिलावर्ग शेणाच्या गोव-या थापतात. ऐन पावसाळ््यात साठा केलेल्या गोव-यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर होतो. या गोव-यांना आॅनलाइनच्या बाजारपेठेत एवढे महत्त्व येईल, असे शेतक-यांना कधीच वाटले नव्हते. परंतु आता शेतक-याकडील गोवºयाना चांगलाच भाव आला आहे.
कंपन्यांची होम डिलिव्हरीची सुविधा-
गोवºयांची नगाने विक्री होत आहे. नऊ गोव-याची किंमत दीडशे ते दोनशे रुपये असून, या गोवºयाची काही दिवसांत होम डिलिव्हरी मिळण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. विविध कंपन्यांच्या संकेतस्थळावर गोव-याची किंमत वेगवेगळी असली, तरी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºयांची आॅनलाईन विक्री होतेय हे नवल राहिलेले नाही. विशेष म्हणजे आकर्षक पॅकिग असणा-या विविध आकारातील गोव-यांना आॅनलाइन ग्राहकही मिळू लागला आहे. शहरात सर्वकाही आॅनलाईन आणि घरबसल्या खरेदी करणारा ग्राहक आता गोव-याही आॅनलाइन खरेदी करू शकणार आहे.

Web Title:  Customer demand: Online sale of Goa for Holi