शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Maharashtra lockdown: पुण्यात संचारबंदी फक्त कागदावरच! प्रमुख चौकात गर्दीचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 11:54 IST

चौकांमध्ये बॅरिकेड्स, पण पोलीस नाहीत

ठळक मुद्देदेशात येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत पुणे २ नंबरवर

पुणे: राज्यात कोरोनाचा विळखा अत्यंत घट्ट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्यात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र दिसून आले आहे. 

काल रात्री ८ नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आज पहिल्या दिवशी पुण्यातील प्रमुख रस्ते आणि चौक यांची पाहणी केली. अत्यंत खेदजनक चित्र पाहणीतून दिसून आले आहे. कालच देशात कोरोना रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर हजाराहूनही अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. तर पूर्ण देशात येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत पुणे २ नंबरवर आहे. तरीही पुण्यातील नागरिक काही ना काही कारणाने बाहेर पडत असलेले पहायला मिळाले.शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन, कर्वे रोड लक्ष्मी, महात्मा गांधी रस्ता अशा अनेक रस्त्यांवर सकाळपासूनच गर्दी दिसून आली आहे. बाहेर येणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत का नाही हे ओळखणेही कठीण आहे. 

सरकारकडून सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद आहेत. मात्र नागरिक नोकरी आणि काही कामांसाठी बाहेर पडले आहेत असं त्यांनी गाड्यांवर लावलेल्या स्टिकर्स आणि बोर्ड वरुन दिसत होतं. 

चौकांमध्ये बॅरिकेड्स पण पोलीस नाही........शहरातील काही चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण त्याठिकाणी पोलीस नसल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकणी पोलीस असूनही नागरिकांना अजिबात थांबवले जात नाहीये. 

बॅंकांबाहेर गर्दी दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बॅंकाबाहेर गर्दी पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर लोक आत बॅंकेतली आज कामे करुन बाहेर पडलेले दिसले. अनेक बॅंकाबाहेर रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र