शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Ganesh Festival 2021: पुण्यात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 11:06 IST

पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार

पुणे : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १० ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी हा आदेश लागू करण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ.  रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. त्याबरोबरच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास तसंच संचार करण्यास मनाई असे आदेश लागू केले आहेत. पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. 

शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्सवासाठी नागरिक बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे ७ हजार पोलिस कर्मचारी, ७०० अधिकारी,शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक,छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश राहणार आहे.

गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके

शहरात गणेश उत्सवात गुन्हे घडू नये म्हणून गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये १०० कर्मचारी राहणार आहेत. त्याबरोबरच घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचा ही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीची नजर

पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, महत्वाची मंडळी यांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ते सर्व चित्रिकरण थेट पोलिस ठाण्यात दिसेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एका कर्मचार्याची नेमणूक केली जाणार असून, उत्सव कालावधीतील चित्रिकरण संग्रहीत ठेवले जाणार आहे.

''यंदा देखील उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे असंही त्यांनी सांगितलं आहे.''

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिसganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव