शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या : अजित पवार; कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:37 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देबारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाचा मेळावामोदी सरकारच्या जीएसटी व नोट बंदीमुळे कला क्षेत्राला फटका बसला : अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. कलाकारांवर दडपण न येता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक कलागुणांना पोषक वातावरण मिळाले पाहिजे, यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा बारामती हॉस्टेल येथे झाला. या मेळाव्यात पुणे शहर सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या.मोदी सरकारच्या जीएसटी व नोट बंदीमुळे कला क्षेत्राला फटका बसला, अशी टीकाही अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेब पाटील हे यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीवर कार्यरत होते. निर्माते माणिक बजाज, दरबार बँडचे प्रमुख इक्बाल दरबार यांची शहर संघटकपदी तर निर्माते नीलेश नवलाखा, अभिनेत्री पूजा पवार, नितीन मोरे, शेखर गरूड, माया धर्माधिकारी यांची शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.पुण्यात पालिकेच्या सहकार्याने कलाकार भवन उभारणे, पालिकेची सांस्कृतिक समिती करण्यासाठी आग्रह धरणे, कलाकारांना विशेष वैद्यकीय सुविधा, राज्य सरकारकडून उपचारासाठी अनुदान कार्ड मिळावे अशा मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.विधानसभा अध्यक्ष निहाय नियुक्त्या : माधवी मोरे (खडकवासला मतदार संघ), जुई भगत (कसबा विधानसभा मतदार संघ), शाल्मीरा पुंंड (शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ), शैलेश जाधव (कोथरूड विधानसभा मतदार संघ), दिलीप मोरे (हडपसर मतदार संघ), रोहिणी तारे (पर्वती मतदार संघ), भास्कर नागमोडे, योगेश सुपेकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे