शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 5:02 AM

१२६ गुन्हे दाखल, १८३ आरोपींचा समावेश

राकेश घानोडेनागपूर : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे परिक्षेत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यावर्षी भ्रष्टाचाराचे सर्वाधिक १२६ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये १८३ आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. अशा प्रतिष्ठित क्षेत्रातील ही शोकांतिका आहे.

सदर आकडेवारी १ जानेवारी ते १७ नोव्हेंबर २०२० या काळातील असून, ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत विभागाने राज्यभरात भ्रष्टाचाराच्या ५७९ प्रकरणात कारवाई केली. त्यात सापळ्याच्या ५४८, अपसंपदाच्या १० तर, अन्य भ्रष्टाचाराच्या २१ प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे परिक्षेत्रात सापळ्याच्या १२३ (आरोपी-१७४), अपसंपदाच्या १ (आरोपी-४) तर, अन्य भ्रष्टाचाराच्या २ (आरोपी-५) प्रकरणात कारवाई करण्यात आली. 

नाशिक परिक्षेत्र द्वितीय स्थानावर असून, या परिक्षेत्रात सापळा प्रकरणात ८५ (आरोपी-१०७) व अपसंपदा प्रकरणात ३ (आरोपी-६) असे ८८ गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात ११३ आरोपींचा समावेश आहे. याशिवाय सापळा प्रकरणातील ७५ व अन्य भ्रष्टाचारातील ९ प्रकरणे मिळून दाखल ८४ गुन्ह्यांसह अमरावती परिक्षेत्र तृतीय स्थानावर आहे. हे गुन्हे १६९ (सापळा-१०४, अन्य भ्रष्टाचार-६५) आरोपींविरुद्ध दाखल झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण