शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत रणकंदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:05 IST

शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या मुख्ये सभेत याविषयी तीव्र शब्दात पडसाद उमटले.

ठळक मुद्देशहरातील खड्डे, अपघात आणि वाहतूक कोंडी यांना सत्ताधारी जबाबदार असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप शहरात ३०-४०टक्के सिंमेट रस्ते झाले असून गेल्या दोन वर्षांत खड्ड्यांचे प्रमाण कमी

पुणे: सर आली धावून, रस्ते गेले वाहुन, खड्ड्यांमुळे पुणेकर त्रस्त... सत्ताधारी सुस्त, पुणेकरांना खड्ड्यात ढकलणा-या सत्ताधा-यांचा धिक्कार असो..अशी जोरदार घोषणाबाजी करून करत विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ केला. शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या वतीने मुख्य सभेत तीव्र शब्दात पडसाद उमटले.  तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर पडल्याने वाहतुक कोंडी होऊन पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. याला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. या मुख्य सभेत आऱोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना गदारोळात सभागृहनेते व उपमहापौर यांनी सत्ताधारी पक्षाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.      या सभेत विरोधकांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.अनेक अपघातात सर्वसामान्यांचे बळीसुध्दा गेले आहे, तरीसुध्दा सत्ताधारी व प्रशासन ढिम्म अवस्थेत आहे. शहरात सध्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यांत खड्डे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. नियोजन शुन्य कारभाराचे हे परिणाम आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, सत्ताधारी बहुमतामुळे सुस्त झाले आहेत. तर प्रशासन पक्षपाती करत आहे. नागरिकांनी मग आपल्या समस्या कुणासमोर मांडायच्या हा प्रश्न आहे. सभागृहात शहरातील खड्ड्यांवर एकही सत्ताधारी बोलत नाही. त्यावर उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी माझ्या वॉर्डमध्ये खड्डे नाही असे सांगत हरकत घेतली. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, शहरात ३०-४०टक्के सिंमेट रस्ते झाले असून मुख्य रस्त्यांवर खड्डे नाहीत. गेल्या दोन वर्षांत खड्ड्यांचे प्रमाण कमी झाले. येणा-या काळात शहर खड्डे मुक्त होईल. या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना यांनी सत्तेत असलेल्या भाजपला लक्ष केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना