शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस गाठला! कोंबडीसोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओ अपलोड केला, मुलावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:57 IST

पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस लैंगिक छळ, बलात्कार या घटनेत मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस लैंगिक छळ, बलात्कार या घटनेत मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. एक दिवसाआड शहरातून लैंगिक छळाच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. अल्पवयीन मुलांकडूनही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. बलात्कार, कुटुंबातील शारिरीक छळ यामुळेही स्त्रियांच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहू लागला आहे. लैंगिक छळाबरोबरच नराधमांकडून घृणास्पद कृत्याच्या घटनेत सध्या वाढ होऊ लागली आहे. त्यातच काल कोंबडीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने हे घृणास्पद कृत्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.   एका मुलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत त्या मुलाने एका हातात कोंबडी पकडून अश्लील कृत्य केले होते. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मे २०२१ ला पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० ते १२ वर्षे वयाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत मागील आठवड्यातही घडली होती घृणास्पद घटना; महिलेला केला होता लघवी पाजण्याचा प्रयत्न 

 शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली. तसेच तिला जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सूसगाव येथे १५ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिला सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी व त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी, लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला होता. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपींनी केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना आरोपींनी घरात डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया