बंदोबस्तासाठी सीआरपीएफ
By Admin | Updated: October 2, 2014 23:21 IST2014-10-02T23:21:46+5:302014-10-02T23:21:46+5:30
संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांतूून मिळू शकणारा जादा बंदोबस्त या वेळी मिळू शकणार नाही.

बंदोबस्तासाठी सीआरपीएफ
>पुणो : संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांतूून मिळू शकणारा जादा बंदोबस्त या वेळी मिळू शकणार नाही. या पाश्र्वभूमीवर बंदोबस्तासाठी केंद्रीय राखीव दलाची (सीआरपीएफ) मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदारसंघ निश्चित करण्यात येत आहेत. बुधवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा नव्याने संवेदनशील मतदारसंघ निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.
शहरात 7 हजार 471 तर जिल्ह्यात 3 हजार 236 मतदान केंद्रे आहेत. शहर पोलिसांकडे 8 हजार
तर ग्रामीण पोलिसांकडे अडीच हजार मनुष्यबळ आहे. शहर पोलिसांकडून त्यांना 5क्क् कर्मचारी उपलब्ध
करून दिले जाणार आहेत.
तसेच साइड ब्रँचमध्ये कार्यरत सर्वाना बंदोबस्ताला तैनात केले जाणार आहे.
जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. संवेदनशील मतदान केंद्राच्या 2 निकषांमध्ये एक, की ज्या मतदान केंद्रात एकाच उमेदवाराला 75 टक्के मतदान झाले आहे, अशी मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून गृहीत धरली जातात. तर दुसरे, कुटुंबांपैकी केवळ एक-दोनच व्यक्ती मतदान करण्याचे प्रमाण जास्त
असलेले केंद्रही संवेदनशील म्हणून जाहीर आहे. त्यानुसार संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असे राव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
च्कसबा, पर्वती, शिवाजीनगर, वडगावशेरी, कँटोन्मेंट या मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, खडकवासला, कोथरूड या मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम येथे होईल. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होईल, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.