उरुळी कांचनमध्ये सर्वत्र गर्दी, नियमांना हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:08+5:302021-05-05T04:20:08+5:30
गावातील सर्व रस्त्यांवर अतिक्रमण करून या गर्दीत भर टाकली आहे. सकाळी सात ते अकरा या वेळात वाहतूक अनेक ठिकाणी ...

उरुळी कांचनमध्ये सर्वत्र गर्दी, नियमांना हरताळ
गावातील सर्व रस्त्यांवर अतिक्रमण करून या गर्दीत भर टाकली आहे. सकाळी सात ते अकरा या वेळात वाहतूक अनेक ठिकाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. या गर्दीतून रुग्णवाहिकेला ही वाट काढणे अवघड होत आहे, मात्र रस्त्यांवर अतिक्रमण करून जे फळविक्रेते, भाजीविक्रेते बसतात, त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करण्याची मागणी उरुळी कांचन सजग नागरिक मंचाने केलेली आहे.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांना विचारले असता त्यांनी सांगितले की नागरिक व व्यावसायिक कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी अजिबात सहकार्य करीत नाहीत. पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन नियमबाह्य वर्तन करणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायत कडक कारवाई करणार आहे.