सच्चाई मातेच्या दर्शनाला गर्दी
By Admin | Updated: October 2, 2014 23:30 IST2014-10-02T23:30:14+5:302014-10-02T23:30:14+5:30
जोधपूरमधील ओशियन येथील सच्चाई मातेचे प्रतिरुप असलेल्या सच्चाई माता मंदिरात दर्शनासाठी नवरात्रीनिमित्ताने राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांची गर्दी होत आह़े

सच्चाई मातेच्या दर्शनाला गर्दी
>पुणो : जोधपूरमधील ओशियन येथील सच्चाई मातेचे प्रतिरुप असलेल्या सच्चाई माता मंदिरात दर्शनासाठी नवरात्रीनिमित्ताने राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांची गर्दी होत आह़े धनकवडी येथे असलेले हे सच्चाई माता मंदिर स्वयंभू असल्याने मराठवाडा, हैदराबाद तसेच पुणो जिल्ह्यातून सध्या दर्शनासाठी भाविक येत असतात़
नवरात्रीनिमित्ताने या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा अंतर्गत भाग, मंडपाची नाविन्यपूर्णरित्या सजावट केली आह़े सौ़ प्रमिलाबाई नौपतलाल साकला चॅरिटेबल ट्रस्टने 17 वर्षापूर्वी या मंदिराचे निर्माण केले असून ट्रस्टचे अध्यक्ष राजेशकुमार साकला आणि सचिव रवींद्रकुमार साकला आहेत़ मंदिराची देखरेख नौपतलाल साकला हे पहात असतात़ ज्या भाविकांना राजस्थानातील मुळ मंदिरात जाणो शक्य होत नाही़ ते या ठिकाणी येऊन मातेचे दर्शन घेतात़ भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा याच ठिकाणी तयार करण्यात आलेला असतो़ (वार्ताहर)
येथे एक स्वयंभू मूर्ती निघाली़ ही मूर्ती नेमकी कोणत्या देवीची आहे, याचा शोध घेतला असता ती राजस्थानमधील जोधपूरजवळील ओशियनमधील सच्चाई मातेची असल्याचे समजल़े त्यानंतर ट्रस्ट स्थापन करण्यात आला़ मुळ मंदिरातून विभूती आणून येथे उद्यापन केल़े 21 जुलै 1998 रोजी मंदिराची स्थापना झाली़ मंदिरात नऊ दुर्गा असून गाभा:यात सच्चाई मातेची स्वंयभू मूर्ती आह़े मंदिराच्या सुरुवातीला गणोश, हनुमान, शंकरपार्वती अशी 3 मंदिरे आहेत़ त्याच्यानंतर 8 दुर्गा मूर्ती आहेत़ हे मंदिर दक्षिणामुखी असून त्याची सजावट अप्रतिम आह़े
- नौपतलाल साकला