शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

पुण्यातील बस स्थानकांमधील गर्दी ओसरली; कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 12:41 IST

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रवासी संख्येत घट होण्यास सुरुवात सामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवासासाठी करतो एसटीचा वापर

ठळक मुद्देसामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवासासाठी करतो एसटीचा वापर गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनवरून पोहोचली दहावर

अतुल चिंचली -पुणे : गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एसटी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी ओसरल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनवरून दहावर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवास करण्यासाठी एसटीचा वापर करतो. त्यामुळे याचा परिणाम सर्वप्रथम एसटीवर झाला आहे. एसटी स्थानकावर शनिवार आणि रविवार या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी प्रवासी पाहायला मिळतात. पण या दोन-तीन दिवसांत मोकळ्या रस्त्यांप्रमाणे एसटी स्थानकेही मोकळी दिसू लागली आहेत. स्वारगेट आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे म्हणाल्या, फेब्रुवारीमध्ये प्रवाशांची संख्या व्यवस्थित होती. देशात कोरोनाचा रुग्ण आढळल्यावर नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रवासी संख्येत घट होण्यास सुरुवात झाली. दरवर्षी होळीला मोठ्या प्रमाणावर प्रवासी महाराष्ट्रात सर्वत्र जातात. पण यंदा होळीच्या दृष्टीने गाड्यांचे नियोजन करूनही मोजक्याच प्रवाशांनी एसटीने बाहेरगावी जाण्याचे ठरवले. कोकणात होळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक गाड्या असूनही त्या पूर्णपणे भरल्या नाहीत. ............आम्ही एसटी चालकाला गाडी भरून घेऊन जाण्याचे सांगत आहोत. सध्या तरी प्रवासी संख्येत घट झालेली नाही. किंवा उत्पन्नातही फरक जाणवत नाही. पण नागरिक मास्क लावणे, गर्दी न करणे, शांततेत प्रवास करणे अशा प्रकारची जबाबदारी घेताना दिसून येत आहेत. पुण्यात दोन-तीन दिवसांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुढील काही दिवसात प्रवासी संख्येत घट होण्याची शक्यता आहे. - जनार्दन लोंढे, शिवाजीनगर बस स्थानकप्रमुख...............मार्च महिन्यात कोल्हापूर तसेच अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाण्याची योजना होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रवास तसेच गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे मी माझी योजना पुढे ढकलली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवणे फक्त शासनाची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पातळीवर जबाबदारीने वागून या आपत्तीचा सामना केला पाहिजे.-विशाल दहीभाते, प्रवासी

मी एलआयसी एजंट आहे. आता मुंबईला चाललो आहे. कोरोनाचा धोका पुण्याप्रमाणे इतर ठिकाणी जाणवू लागला आहे. फक्त खेडेगावात कोरोना विषाणू आढळला असे मी अजून ऐकले नाही. त्यामुळे मला गावात जाऊन राहणे योग्य वाटते.-प्रदीप चोरगे, प्रवासी.............मला कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांत जावे लागते. एका कामानिमित्त हिंगोलीवरून आलो आहे.पण कोरोनामुळे काही दिवस पुढचा प्रवास करावा की नाही याबद्दल समजत नाही. कोरोना झपाट्याने पसरू शकतो, त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे. इथल्याच नातेवाईकांकडे काही दिवस थांबून परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परत गावी यावे, असे घरच्यांचे म्हणणे आहे.-निनाद सपकाळ, प्रवासी.

 

टॅग्स :PuneपुणेSwargateस्वारगेटpassengerप्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स