‘लीला’च्या प्रमोशनसाठी उसळली गर्दी
By Admin | Updated: April 12, 2015 00:45 IST2015-04-12T00:45:37+5:302015-04-12T00:45:37+5:30
अभिनेत्री सनी लिओनचा बहुचर्चित ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गप्पाटप्पा कार्यक्रमात ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांशी चित्रपटातील कलाकारांनी गप्पा मारल्या.

‘लीला’च्या प्रमोशनसाठी उसळली गर्दी
पुणे : अभिनेत्री सनी लिओनचा बहुचर्चित ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गप्पाटप्पा कार्यक्रमात ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांशी चित्रपटातील कलाकारांनी गप्पा मारल्या. पुण्यातील सीझन मॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने चाहत्यांसोबत डान्स केला. सध्या सेल्फीची धूम आहे. आपल्या चाहत्यांसोबत तिने सेल्फी काढले. आपला आॅटोग्राफ शेअर केला. या प्रमोशनला तिच्यासोबत तिचा पती डॅनिअल वेबरही होता. चाहत्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून तोही भारावून गेला होता. या संपूर्ण प्रमोशन इव्हेंटविषयी नंतर तिने टिष्ट्वटही केले.
सीझन मॉलमध्ये ती पहिल्यांदा आली होती. या वेळी तिने मॉलमध्ये मिळत असलेल्या विविध वस्तूंची विचारपूसही केली.
सीझन मॉलचे महाव्यवस्थापक अजय मल्होत्रा यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. (प्रतिनिधी)