शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील पूर्व भागात फुकट धान्यामुळे रेशनिंग दुकानांसमोर गर्दी ; शिस्तीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:09 IST

दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी

ठळक मुद्देसील केलेल्या या सर्व भागात बहुसंख्य कष्टकरी वर्गाचे प्राबल्य

पुणे : पुणे शहरातील आधीचे २२ व आता २८ असे शहराच्या पुर्व भागातील ५० पेक्षा जास्त भाग कोरोना लॉकडाऊन करण्यात आले आहेत. मात्र फुकट धान्य मिळते आहे म्हणून ते घेण्यासाठी गर्दी करून नागरिकांनी या लॉकडाऊनचा फज्जा उडवला असल्याचे दिसते आहे.पुण्याच्या मध्यभागातील सोमवार ते शनिवार या पेठा तसेच मोमीनपुरा, लोहियानगर, अन्य झोपडपट्या, येरवडा, वानवडी, कोंढवा अशी उपनगरे या भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळेच हा सर्व परिसर सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, मात्र त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेशनिंग दुकानांमधून विनामूल्य धान्यवाटप करण्याचे ठरवले. तेच धान्य मिळवण्यासाठी म्हणून पूर्व भागातील रेशनिंग दुकानात दररोज गर्दी उसळत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवणे आता रेशनिंग दुकानदारांनाही अशक्य झाले आहे.सील केलेल्या या सर्व भागात बहुसंख्य कष्टकरी वर्गाचे प्राबल्य आहे. रोज कमवायचे, त्यातूनच सामान आणायचे व करून खायचे अशी त्यांची स्थिती आहे. रोजच्या रोज तेल मीठ मीरची आणणारी असंख्य कुटुंब या परिसरात आहेत. लॉक डाऊनमुळे रोजगार बंद झाला व त्यांचे हाल व्हायला सुरूवात झाली. त्यात रेशनवर धान्य फुकट मिळते आहे याची माहिती मिळाल्यावर ते पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीतून कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग असे काहीही नियम या गर्दीकडून पाळले जाताना दिसत नाही.रेशनिंग तसेच किरकोळ विक्रीची दुकाने खुली असण्याचा कालावथी सकाळी १० ते १२ असा दोनच तासांचा आहे. तो वाढवून सकाळी ८ ते १२ असा करावा असे काही दुकानदारांचे म्हणणे आहे. तसे केल्यास धान्य किंवा अन्य वाणसामान मिळणारच आहे याची खात्री पटून गर्दी कमी होण्यास मदत होईल असे त्यांचे मत आहे.रेशनिंगचे धान्य नाही पण किरकोळ विक्रीचे किराणा माल दूकान आहे अशा व्यावसायिकांचीही त्यांना मालाचा नियमीत पुरवठा होत नसल्याने अडचण झाली आहे. किरकोळ तेल मीठ धान्य विकत घेणार्यांची त्यांच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. दुकानातून माल मिळत नसल्याने हे गरीब ग्राहक हवालदील झाले आहेत.--------मागील काही वर्षात अनेक दुकानदारांनी रेशनिंग ची जबाबदारी घेणे त्यात फारसा नफा नसल्याने बंदच करून टाकले आहे. त्यामुळे या भागातील रेशनिंग दुकानांची संख्या कमी झाली. एकाच दुकानदाराकडे अनेक कार्ड असे झाले आहे. त्यामुळेही या दुकानांसमोर गर्दी होत आहे. दुकानांचा वेळ वाढवला तर गर्दी कमी होऊ शकते. रेशनिंग नसलेल्या दुकानांनाही मालाचा पुरवठा कमी होत आहे. तोही व्यवस्थित करण्याची गरज आहे.अमोल ऊणेचा, किराणा माल दुकानदार---------लॉकडाऊनचा कालावधी अनिश्चित असल्याने मिळत असलेल्या गोष्टींचा साठा करून ठेवण्याकडे.नागरिकांचा कल वाढला आहे. हडपसर, वानवडी या भागात अनेक वसाहती आहेत. तिथे प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.चेतन तुपे,आमदार. हडपसर विधानसभा

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी