शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये रोकड भरणा करणाऱ्या कंपनीची 'कोटी' ची फसवणुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 15:31 IST

संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते...

ठळक मुद्देभरणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच रोकड केली लंपास

बारामती :  एटीएममध्ये भरणा करणाऱ्या खासगी कंपनीची कर्मचाऱ्यांकडुन १ कोटी १ लाख ८ हजार ८०० रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे.कंपनीचे ऑडिट सुरु असताना हा उघड झाला आहे.याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि. चे ब्रँच मॅनेजर संदिप बाळासाहेब इंगवले (वय ३८ वर्षे,रा. चंद्रकिसन निवास, औंध कॅम्प, पिंपळे निलख ) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार  आरोपी विकी विलास पवळ (वय २५ वर्षे रा. शहाजीनगर भोडणी ,ता.इंदापुर जि.पुणे),अभिजित कोयनाप्पा मदने( वय २५ वर्षे रा.झारगडवाडी ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक  १ जुन ते २० सप्टेंबर २०१९  रोजी १२ ते ६ च्या दरम्यान हा प्रकार घडला. रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि.  कंपनीचे कस्टोडियन  पवळ आणि  मदने  यांनी  कंपनीची एक कोटी एक लाख आठशे रुपये एवढया रोख रक्कमची विश्वासघात करूण फसवणुक केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.कंपनीच्या वतीने सबंधितांविरूध्द कायदेशीर फिर्याद देण्यात आली असुन  कंपनीचे ऑडिट चालु असल्याने ,हा प्रकार फिर्यादी इंगवले यांनी वरिष्ठांचे निदर्शनास आणला .त्यानंतर याप्रकरणी फिर्याद दिल्याचे इंगवले यांनी फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी आर गंपले करीत आहेत.     संबंधित कंपनी बारामती शहरातील काही बँकाच्या एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करते.या दरम्यान, एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करताना १ कोटी १ लाख रुपये रोख रकमेचा गफला झाल्याचे कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.परिसरातील १७ एटीएम मध्ये रोख रकमेचा भरणा करताना आरोपींनी आर्थिक फसवणुक केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीfraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसाatmएटीएम